Friday, June 16, 2023

बायकांकडून नवऱ्यांना संबोधण्या बाबतचा इतिहास

 सहज गंमत...

बायकांकडून नवऱ्यांना संबोधण्या बाबतचा इतिहास तुम्ही वाचलाच पाहिजे.....


न्या. रानडे यांच्या घरी एकदा कोणी गृहस्थ आले. न्यायमुर्ती घरी आहेत का? विचारलं.


रमाबाई म्हणाल्या, *"खुंटीवर पगडी दिसत नाहीये.”*


त्या माणसाला काही कळलं नाही. त्याने परत विचारलं.


रमाबाई म्हणाल्या, *“जोडेही दिसत नाहियेत."*


तरिही त्याला कळलं नाही त्याने पुन्हा तेच विचारलं.


रमाबाई म्हणाल्या, *"कोपऱ्यात काठीही दिसत नाहिये."*


*ते घरी नाहियेत हे सांगण्याची ही त्या काळची पद्धत झाली.*


नावाने सोडाच पण *"हे"* वगैरे उल्लेखही केला जात नव्हता त्या काळी.


*का. पु. स. (काळ पुढे सरकला)* ..... नवर्‍याचा उल्लेख *"इकडुन येणं झालं"*, तिकडुन सांगणं झालं *"इकडची स्वारी”* असा होऊ लागला.


मऱ्हाटी शिणुमात *"एक माणुस रागावलंय जणू आमच्यावर"* असा लडिवाळपणा करु लागला.


*का. पु. स.* ..... नवर्‍याचा उल्लेख *अहो, माझे यजमान, माझे मिस्टर असा होऊ लागला*.


*का. पु. स.* ..... नवर्‍याला चारचौघांच्यात *अहो*, तर *एकांतात लाजत लाजत अरेतुरे* सुरु झालं.


याशिवाय  *खाशा स्वाऱ्या, घरधनी, कारभारी, मालक, पप्पुचे पप्पा, बंटीचे बाबा, अहो नारायण* हा एक समांतर प्रवास चालु होताच .....


*का. पु. स.* ..... नवर्‍याचा उल्लेख *रितसर नावाने किंवा माझा नवरा* असा होऊ लागला.


*का.पु.स.* ..... नवर्‍याचा उल्लेख *बंड्या, खंड्या, निल्या, मित्या* असा यायाकारी होऊ लागला.


*का. पु. स* ...... *सिरिअल्स* मधुन आणि कुठे कुठे प्रत्यक्षातही *शोना, बच्चु,पिलु,डार्लिंग, बेब, Hb, हब्बी, हब्बुडी* असा होऊ लागला.    


या सगळ्याला मागे टाकील असा एक अति लडिवाळ उल्लेख हल्ली वरचेवर आढळायला लागलाय तो म्हणजे  *नवरू*  ..... 

अगदी नारू म्हटल्यासारखं वाटतं आणि, *"नारुचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा"* किंवा *"पाणी गाळा नारू टाळा"* अशा भिंतीवर लिहिलेल्या जाहिराती डोळ्यासमोर तरळायला लागतात.😀


पण सर्वात धडकी भरवणारी हाक म्हणजे.. *अहो..ऐकलत का* याला अजुन तोड नाही.


असा हा नवरे जमातीचा इतिहास.......


🙏🙏


एका माणसाने शेतक-याच्या बायकोला "नवरा घरी आहे का?"

अशी विचारणा केली. बायको रमाबाईंची फॅन.‌

तिने सांगितले "बैल शेतातून अजून परतला नाही".


☹️😀

Monday, May 29, 2023

थोडीशी गम्मत....

 *थोडीशीच गंम्मत* (Forwarded)

१) स्वर्गात जायचे असेल तर आईचे पाय दाबून झोपत जा.. मग ती आई तुमची असो वा तुमच्या पोरांची..😂


२) काही चेहरे मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी भाग पाडतात..😂


3) काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत. फक्त दुकानातून बाहेर जायची ॲक्टिंग करतात.


४) रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..😂


५) चष्मे लावणाऱ्या लोकांचं अर्ध आयुष्य.. "माझा चष्मा कुठं आहे" हे शोधण्यातच निघून जातं.. 😂


६) तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक घेतली तरी.. ती ॲक्टिवा च्या मागेच चालणार..😂


७) मटणाच्या आणि दारुच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला.. Corona ची किंचित ही भीती नसते..😂


८) कुंडली  खरं तर सासू अन् सुनेची जुळली पाहिजे. मुलगा  बिचारा कुणाशीही adjust करून घेतो..😂


९) ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात.. त्यांना ट्रेकिंगला जायची गरज नसते..😂


१०) लग्नात मुलीचे मामा अन् नवरी सोबत असलेली करवली.. या दोघांच्या attitude ची बरोबरी कोणीच करू शकत नाही..😂


११) आज कालच्या पोरा पोरींपेक्षा संस्कारी तर मच्छर आहेत.. सातच्या आत घरात येतात..😂


१२) ज्यांचं मन साफ असतं ना.. त्यांना रोज आंघोळ करायची गरज नसते...😂


१३) जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..😂


१४) आयफोन वाल्यांच अर्ध आयुष्य.. मिरर सेल्फी काढण्यात अन् आयफोन चा EMI भरण्यातच निघून जातं...😂


१५) वर्षभर Dp न बदलणारे.. जेव्हा २-२ दिवसात Dp बदलतात.. तेव्हा समजून जायचं.. कोणीतरी नवीन 'जेवलीस का ' add झाली आहे..😂


१६) पोट आणि Ego कमी असेल तर.. माणूस कोणालाही मिठी मारू शकतो.. 😂


१७) गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. "तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..? 😂


१८) काही लोक रोज सकाळी लवकरच उठतात.. फक्त त्यांना शुद्धीवर यायला १-२ तास लागतात.. 😂


१९) आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त Hmm Hmm करत असतो.. त्याला काहीच ऐकू येत नसतं..😂


२०) जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..😂


२१) जेव्हा आपण Sad Mood मध्ये असतो.. तेव्हा गाणं गातो नंतर आपल्याला कळतं..की आपला आवाज तर आपल्या Condition पेक्षाही खराब आहे.. 😂 😄


*ज्ञान समाप्त*

Wednesday, December 15, 2021

११ मित्रांचे किस्से

११ मित्रांचे किस्से

 
ओळखा पाहू 👇
1) सकाळी सकाळी बायको चा हसरा चेहरा बघा. दिवस मस्त जातो.*


** मग बायको कुणाची पण असो.
😊😂😂

2) पुण्यातील सोसायटीच्या बाहेर लागलेली पाटी 


अतिथि देवो भव

परंतु देवांना नम्र विनंती आहे की
त्यांनी आपापली पुष्पक विमाने सोसायटीच्या बाहेर पार्क करावीत...
😂😂😂😂😂

3) मुलगा- मी तुमच्या मुलीवर 10 वर्षांपासून प्रेम करतोय

पुणेरी वडील - मग आता काय पेन्शन मागायला आलायस ??
😬🤦🏻‍♂😬😂😂😂

4)
एक छोटा विनोद...

बायको :- मी दोन तासासाठी बाहेर जात आहे... तुम्हाला काय हवंय..?

नवरा :- मला तेच हवंय...
😄😄😄🤣🤣



5) काल मी लिफ्टने वर जात होतो,
त्यावेळी एका बाईने लहान मुलासह लिफ्टमध्ये प्रवेश केला .. !!
मी लिफ्टचे बटण दाबले आणि विचारले:
"दुसरा की तिसरा?"
बाईंनी रागाने म्हटले

"आत्या आहे मी याची."
😆😆😆😆😆😆
6) काल एका जुन्या मित्राला चार पाच वेळा कॉल केला पण त्याने उचललाच नाही।
  मग आज मी एक मेसेज पाठवला ...
"आपल्या वर्गातील 'श्रेया' आठवते ना. ती आज सकाळी भेटली होती. तुझा नंबर विचारत होती. देऊ का ??"

सकाळपासून किमान 15 वेळा फोन केला पठ्ठ्याने.  .
मग मी पण उचलला नाही.
😆😷 😀😄😄😀

7) पुणेकर v/s पुणेकर
पहिला पुणेकर - तुम्हाला आमरस देऊ की बासुंदी ?

दुसरा पुणेकर - घरात एकच वाटी आहे का ?🤔🤔😃😂🤣😆



8) याला अपमान म्हणावं की प्रेम? 🙊
नवऱ्याने, बायकोला विचारले: “तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??”

बायको: “दोन्हीही नाही…. मला  तुम्हीच आवडता!”
😂😂😂


9) रामायण मालिका बघतांना राक्षसिणीला पाहून मुलाने विचारले : ही कोण ?
मम्मी म्हणाली : आत्या.
पप्पा म्हणाले : मावशी.

मग काय रामायण संपले आणि महाभारत चालू झाले

10) सध्या करोना म्हटलं की लोकांना लगेच काळजी घ्या म्हणण्याची इतकी सवय लागलीय की प्रत्येक पोस्टवर न वाचता काळजी घ्या ठोकून देताहेत.

मी पोस्ट टाकली होती...
कोरोनामुळं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला बायको सोबत दीर्घकाळ राहता आलंय!

माझ्या या पोस्टला शंभर-सव्वाशे जणांनी "काळजी घ्या" असा सल्ला  दिला.
😃😛😛😛 🤭


 
11) तो बायकोला म्हणाला,  
"You are my strength."

बायको त्याला म्हणाली,
"It means other women are your weakness?"

आता वाकड्यात शिरायचे म्हटल्यावर काय?

😃😃😃

Friday, September 11, 2020

कोविड 19 लॉक डाउन मधील पुणेरी पाट्या

*कोविड 19 लॉक डाउन मधील पुणेरी पाट्या*
*पुणेरी पाटी १*
सॅनिटायझर फुटपंपाला गाडीचा एक्सलेटर समजून पायानं वारंवार दाबत बसू नये... 
एकदा दाबल्यानंतर हात साफ करण्यापुरतं चार थेंब पुरेसं सॅनिटायझर येतं... 
आपल्याला हात साफ करायचे आहेत, 
अंघोळ करायची नाही

*पुणेरी पाटी २*
*दुकानात आल्यावर मास्क असताना ‘मला ओळखलंत का?’ वगैरे फालतू प्रश्न विचारू नयेत. चेहरा झाकलेला असताना नुसते डोळे पाहून ओळखायला, आम्ही सीबीआय ऑफिसर नाही.
...किंवा तुमच्या डोळ्यांत डोळे घालून बघायला प्रियकर-प्रेयसीसुद्धा नाही.

*पुणेरी पाटी ३*
दुकानात आल्यावर एकदा तरी लांबूनच मास्क काढून चेहरा दाखवा व पुन्हा मास्क घाला. त्यामुळे ओळख पटण्यास मदत होईल आणि पूर्वीची उधारी आहे की नाही, याची शहानिशा करता येईल.

*पुणेरी पाटी ४*
आमच्याकडे वर्षानुवर्षे दुपारी एक ते चार दुकान ‘लॉकडाऊन’ करण्याची परंपरा आहे. ती आम्ही पाळणारच. या वेळेत उगाच ‘आता लॉकडाऊन उठला आहे, दुकान बंद का ठेवलंत? इतके दिवस बंदच होतं ना...’ 
वगैरे विचारून अपमान करून घेऊ नये.

*पुणेरी पाटी ५*
आमच्याकडे बरोबर सहा फूट लांबीची घडीची काठी मिळेल. ती जवळ ठेवल्यास बाहेर भेटणाऱ्यांशी बरोब्बर अंतर मोजून आणि अंतर राखून बोलता येईल.

*पुणेरी पाटी ६*
कपड्यांचे दुकान : खरेदीला एकट्यानेच यावे. ट्रायलसाठी परवानगी नाही. ‘ट्रायलरूम नाहीये का,’ असं वारंवार विचारू नये. दोन हजारांची चेंज व कपड्यांचे एक्स्चेंज येथे होत नाही. खरेदी केलेल्या कपड्यावर मॅचिंग मास्क मोफत मागू नये.

*पुणेरी पाटी ७*
हॉटेलमधील पाटी : येथे ऑर्डरनुसार फक्त पार्सल मिळेल. ‘बडीशेपचंही पार्सल द्या’, अशी मागणी करू नये. वेगळा चार्ज पडेल. (उद्या हात धुण्यासाठी पाणीही पार्सलमध्ये मागाल... अहो घरचे पाणी वापरा)

*पुणेरी पाटी ८*
घरावरील पाटी : दारावरची बेल वाजवण्यासाठी खाली काठी ठेवली आहे. प्रत्येकाला सॅनिटायझर देणं आम्हाला परवडत नाही. बेल वाजत नसल्यास त्याच काठीनं कडी टूक टूक वाजवत बसू नये.

*पुणेरी पाटी ९*
सोसायटीतील पाट्या : तरुण मुुला-मुलींनी सोसायटीच्या आवारात परस्परांशी बोलताना सीसीटीव्हीत दिसेल असं सुरक्षित अंतर राखून थोडा वेळ मास्क काढून बोलावे. मास्कमुळे ओळख लपवत पालकांकडून ‘बेनिफिट ऑफ  डाऊट’ घेऊ नये.

*पुणेरी पाटी १०*
वॉचमनकडून इन्फ्रारेड टेंपरेचर गनद्वारे वारंवार टेंपरेचर तपासत बसू नये. रीडिंग बदलणार नाही. तेवढेच  येते. ऑक्सिमीटरमध्ये वारंवार बोटं घालत बसू नये. तो गुदमरेल.

😂😱🤔🙏👏😌

Wednesday, May 17, 2017

दारू

ब्रँडी + पाणी = किडन्यांना घातक
रम + पाणी = लिव्हरला घातक
व्हिस्की + पाणी = हृदयाला घातक
जिन + पाणी = मेंदूला घातक
तेव्हा,
पाणी टाळा

'
नीट' प्या!!!

****************

आयुष्यात कधी ना कधी
आपण स्वत:ला
काही महत्त्वाचे प्रश्न
विचारलेच पाहिजेत...
आपण कोण आहोत?...
कोठून आलो आहोत?...
कोठे निघालो आहोत?...
आणि जेव्हा तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले
बार उघडे असतील का?!!!

****************

जो एकटा पितो
तो नरकलोकात जातो
जो दोस्तांबरोबर पितो
तो स्वर्गलोकात जातो

जो पीतच नाही,
तो...
....

तो 'जसलोक'मध्ये जातो!!!!

*****************************************************************

नेहमीच्याच बारमध्ये नेहमीच्याच मेंबरांची सपत्नीक पाटीर् ऐन रंगात आली होती. रामरावांसकट सगळ्यांनी दोन दोन क्वार्टर रिचवल्या होत्या. अचानक रामराव चित्कारले, ''मित्रहो, आपल्यापैकी जे विवाहित असतील, त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी उठावं आणि ज्या व्यक्तीमुळे त्यांच्या आयुष्याला अर्थ लाभला, ज्या व्यक्तीमुळे त्यांचं आयुष्य सुखाचं झालं,त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन उभं राहावं...''
क्षणार्धात रोज दारू र्सव्ह करणाऱ्या बगाराम वेटरशेजारी अशी काही झुंबड उडाली म्हणता!!!!

************************************************************

तो फार सज्जन माणूस होता.
त्याने कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.
त्याने आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही.
त्याने परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही...

....
तो मरण पावला,
तेव्हा इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला...

....
ते म्हणाले, 'जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!'