Monday, October 28, 2013

एक छोटीशी गोष्ट....

एक छोटीशी गोष्ट....आवडली तर नक्की शेअर करा!

" गणपतीपुळेच्या समुद्रकिनार्यावरून विशाल व कपिल हे जिवलग मित्र फिरत होते,
बोलता बोलता त्यांच्या मध्ये छोट्याश्या गोष्टीवरून वाद झाला, व कपिलने विशालला कानाखाली मारली,

त्यावेळी विशाल काहीच बोलला नाही व त्याने खालील वाळू वर लिहिले कि,
" आज माझ्या जवळच्या मित्राने मला कानाखाली मारली "

थोड्यावेळाने ते दोघे समुद्रात स्नान करायचे ठरवतात,
स्नान करताना विशालचा तोल जातो व तो समुद्रामध्ये बुडायला लागतो ......

त्यावेळी कपिल त्याला वाचवितो, बाहेर आल्यावर विशाल एका दगडावर लिहितो कि, " आज माझ्या जवळच्या मित्राने माझे प्राण वाचविले"

ते वाचून कपिल म्हणतो :- जेव्हा मी तुला दुखविले तेव्हा तू वाळू वर
लिहिलेस व जेव्हा मी तुला वाचविले तेव्हा तू दगडावर लिहिलेस .. असे का ??

विशाल :- " जेव्हा कोणी आपल्याला दुखवितो, आपण ती गोष्ट वाळूवर लिहायला पाहीजे , जेणेकरून माफीचा वारा व दोस्तीची शीतल लाट येऊन लगेच ते पुसून टाकेल .....
पण जेव्हा कोणी आपल्याला सुखवितो तेव्हा आपण ती गोष्ट दगडावर कोरायला पाहीजे, जेणेकरून सोस्याटाचा वारा किंवा कोणतीच लाट ते कधीच पुसू शकणार नाही "

तात्पर्य :- " काच फक्त एकदाच तडकते व नंतर ती फक्त आणि फक्त फुटतच जाते.
आपल्या नात्याची तडकत आलेली काच कशी चमकावयाची हे आपल्याला ह्या गोष्टीवरून शिकायला मिळते 
Posted by - आईच्या गावात अन १२ च्या भावात. on Facebook

Wednesday, October 23, 2013

नवरा बायको रिटर्न ईश्टाप !

सावधान !  आधी हिकडं तिकडं नजर मारा. नवरा किंवा बायको आजूबाजूला असेल तर थोडं थांबा. ई श्टाप ! तिच्या किंवा त्याच्या हातात लाटणं बिटणं काही असेल तर अजूनच सावध. आणि हसताना तोंडावर टॉवेल धरा.  पोट हलणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर तुमची रवानगी येड्यांच्या इस्पितळातच व्हायची. 
हपिसात असाल तर सायबाच्या जायची वाट बघा. चमच्यांपासून सावधान. ई श्टाप ! तुमच्या हसण्यावर कंट्रोल सुटला की तुमचे ’आता वाजले की बारा’ समजा.
नवरा बायकोची केमिस्ट्री कितीही झाली तरी हायड्रोजन आणि ऑक्सिजन सारखीच. जवळ आले की आधी स्फ़ोट. मग नंतर काय ते.  त्यांच्यातल्या त्या धमाल नात्यावर हा अंक. जास्त सिरियसली घेऊ नका नाही तर हिमालयात साधूंची गर्दी व्हायची. ई श्टाप !
रेणुका रेपाळ आणि सुप्रिया जाधव यांच्या  संपादनाने आणि आनंदाच्या चित्रांनी सजवलेली  ही भट्टी कशी वाटतेय कळवा. ( esahity@gmail.com )




































Friday, October 11, 2013

'गाय' या विषयावर निबंध

सरांनी वर्गात मुलांना सांगितलं
'' उद्या येताना 'गाय' या विषयावर निबंध लिहून आणा...''
मग वाचा आपल्या 'गणप्या' ने लिहलेला निबंध

"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात.
भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात. गाईला चार पाय आणि दोन कान असतात. गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते.

गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात.
मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात. ते टेस्टी असते.
गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात. गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो.

गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात. शीला ताई शेणाच्या गौ-या करते. गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात. वसु बारसेला वासराचे बारसे करतात. गाईची पूजा होते.

पूजा मला आवडते. ती माझ्या शेजारी बसते. गाईला माता म्हणतात.

भारत माता की जय!!!!

Friday, October 4, 2013

एकदा वाचा… थोडा वेळ लागेल पण नक्कीच आवडेल...



एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला, दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो पण काहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण....
परतताना मनात विचार येतो ‘तो ड्रेस घ्यायला हवा होता''.



सिग्नलला गाडी थांबते,
चिमुरडी काच ठोठावते. गोड हसते, पण भिक मागत आहे हे लक्षात घेऊन त्या हसण्याकडे फार लक्ष देत नाही आपण... २-३ रुपये द्यावे असे मनात येते...


रेंगाळत सुटे शोधता शोधता ‘देऊ का नको’ हा धावा मनात सुरू असतो, तेवढ्यात सिग्नल सुटतो, गाडी पुढे घ्यायची वेळ येते...
थोडे पुढे गेल्यावर मन म्हणते, ‘सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला'.


जेवणाच्या सुट्टीत ऑफिसातला मित्र त्याच्या घरातला त्रास फार विश्वासाने सांगतो, त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात...
वाईट वाटते खूप, नशीब आपण त्या परिस्थितीत नाही असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळे होतो...
‘काही मदत हवी का?’ असे विचारायचे असूनही आपण गप्प राहतो." जेवणाची सुट्टी संपते...तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो...
क्षणभर स्वत:वर राग येतो, ‘मदत तर विचारली नाही, निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात तरी ठेवायला हवा होता मी!


असेच होते नेहमी, छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात,  खरं तर या छोट्या गोष्टीच जगण्याचे कारण असतात.
गेलेले क्षण परत येत नाहीत,

राहतो तो ‘खेद’, ….करता येण्यासारख्या गोष्टी न केल्याचा. जगण्याची साधने जमवताना जगणेच राहून जात नाहीयेना ते ‘चेक’ कर...






==================

"आनंद झाला तर हसा.. J, “


“वाईट वाटले तर डोळ्यांना बांध घालू नका".

“चांगल्या गोष्टीची दाद द्या, “


“आवडले नाही तर सांगा,घुसमटू नका.”

“त्या त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा, नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही. “


“आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या,”

“त्या छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात गुंफणे म्हणजेच जगणे.”

“आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली तर ‘लाईफ’ कसले?”

“आपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले तर लाईफ कसले?”

“मित्रांच्या फालतू विनोदांवर पोट दुखेस्तोवर हसलो नाही तर कसले लाईफ?”


“आनंदात आनंद आणि दु:खात दु:ख नाही जाणवले तर लाईफ कसले?... छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात गुंफणे म्हणजेच जगणे.”