Wednesday, May 17, 2017

दारू

ब्रँडी + पाणी = किडन्यांना घातक
रम + पाणी = लिव्हरला घातक
व्हिस्की + पाणी = हृदयाला घातक
जिन + पाणी = मेंदूला घातक
तेव्हा,
पाणी टाळा

'
नीट' प्या!!!

****************

आयुष्यात कधी ना कधी
आपण स्वत:ला
काही महत्त्वाचे प्रश्न
विचारलेच पाहिजेत...
आपण कोण आहोत?...
कोठून आलो आहोत?...
कोठे निघालो आहोत?...
आणि जेव्हा तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले
बार उघडे असतील का?!!!

****************

जो एकटा पितो
तो नरकलोकात जातो
जो दोस्तांबरोबर पितो
तो स्वर्गलोकात जातो

जो पीतच नाही,
तो...
....

तो 'जसलोक'मध्ये जातो!!!!

*****************************************************************

नेहमीच्याच बारमध्ये नेहमीच्याच मेंबरांची सपत्नीक पाटीर् ऐन रंगात आली होती. रामरावांसकट सगळ्यांनी दोन दोन क्वार्टर रिचवल्या होत्या. अचानक रामराव चित्कारले, ''मित्रहो, आपल्यापैकी जे विवाहित असतील, त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी उठावं आणि ज्या व्यक्तीमुळे त्यांच्या आयुष्याला अर्थ लाभला, ज्या व्यक्तीमुळे त्यांचं आयुष्य सुखाचं झालं,त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन उभं राहावं...''
क्षणार्धात रोज दारू र्सव्ह करणाऱ्या बगाराम वेटरशेजारी अशी काही झुंबड उडाली म्हणता!!!!

************************************************************

तो फार सज्जन माणूस होता.
त्याने कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.
त्याने आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही.
त्याने परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही...

....
तो मरण पावला,
तेव्हा इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला...

....
ते म्हणाले, 'जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!'