Friday, June 13, 2014

१०० लोकांचा एक समूह आयुष्यावर वक्तव्य
करणाऱ्या एका प्रख्यात वक्त्याचा सेमिनार
अटेन्ड करीत
होते...
त्या वक्त्याने प्रत्येकाकडे एकेक
फुगा (balloon)
दिला .
प्रत्येकाने फुगा फुगवायचा आणि त्यावर
आपले नाव टाकून
हॉल मध्ये सोडायचा होता. सर्व लोक
कामाला लागले.
प्रत्येक जण आपण फुगवलेल्या फुग्यावर
स्वतः चे
नाव टाकीत
होता. बघता बघता हॉल १०० फुग्यांनी भरून
गेला...
नंतर त्या वक्त्याने सर्वांना ५
मिनिटांचा अवधी दिला आणि इतक्या साऱ्या फुग्यांतून
स्वतः चे नाव
असलेला फुगा शोधायला लावला.!!
इतक्या भरगच्च फुग्यांतून
स्वतः फुगवलेला फुगा शोधताना सर्वांची तारांबळ
उडाली. ५
मिनिटे
संपली तरीही कुणीही स्वतः च्या नावाचा फुगा शोधू
शकला नाही!!
... नंतर त्या वक्त्याने
प्रत्येकाला कुणाचेही नाव असलेला एक
फुगा उचलायला सांगितले. प्रत्येकाने एकेक
फुगा उचलला.
वक्त्याने प्रत्येकाला सांगितले
की आपल्याकडे
ज्याच्या नावाचा फुगा आहे
त्या माणसाला तो फुगा देऊन टाका.
अश्या प्रकारे प्रत्येकजण आपल्या हातातील
फुग्यावर ज्याचे
नाव आहे त्याला तो देऊ लागला आणि २
मिनिटांत
प्रत्येकाकडे
स्वतःच्या नावाचा फुगा आला.!!
यावर तो वक्ता बोलू लागला…
"आपल्या आयुष्याचेही असेच झाले आहे.!
प्रत्येक
जण आनंद,
सुख, समाधान
या गोष्टी शोधण्यासाठी जंग जंग
पछाडतो आहे... परंतु खरा आनंद, खरे सुख
कशात
आहे
याची कुणालाही कल्पना नाही...
स्वतः चा खरा आनंद आणि खरे समाधान
इतरांच्या आनंदात
दडलेला असतात. इतरांना त्यांचा आनंद
द्या आणि त्याबदल्यात तुम्हालाही नक्कीच
आनंद
आणि समाधान मिळेल.
मानवी आयुष्याच्या यशाचे खरे
गमक यातच आहे...." हे ऐकून संपूर्ण हॉल
नि:शब्द
झाला....
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात
आहे,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध
घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल..!
माणसाच्या बाबतीत परमेश्वर
कमालीच्या दयाळूपणाने वागलाय..
जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो..
पण मृत्यूच
येण मात्र अकस्मात असत.. कारण
त्याला माहितीय, माणूस
सुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र
पचवू शकत
नाही..
स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!
विश्वास उडाला की आशा संपते!
काळजी घेण सोडल की प्रेम संपत!
म्हणुन, स्वप्न पाहा,
विश्वास ठेवा,
आणि काळजी घ्या!
आयुष्य खुप सुन्दर आहे.🌠....🌠

Thursday, June 5, 2014

तर समजावं... अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

आजही पाकिटात कधीतरी दडवलेली
जुनी पाचशेची नोट सापडली आणि
मनापासुन आनंद झाला तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
घराबाहेर पडताना मोठ्यांच्या पाया
पडावसं वाटलं तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
भर पावसात बाईक थांबवून
रस्त्याशेजारच्या टपरीवरच्या गरमागरम
भज्यांचा आस्वाद घ्यावासा वाटला
तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
जुने, साधेसुधे शाळकरी मित्र
भेटल्यावर, त्यांना पूर्वीसारखी
कडकडून मिठी माराविशी वाटली
तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
साबणाची वडी चपटी होईपर्यंत
वापरता आली, टूथपेस्ट अजूनही
शेवटपर्यंत पिळता आली तर समजावं
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
आईने किसलेल्या खोबर्याचा आणि
शेंगदाणा कुटाचा न लाजता बकाणा
भरता आला तर समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
संध्याकाळी सातच्या आत घरात
येऊन शुभंकरोती म्हणावसं वाटलं
की समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
तुमच्या गरीब मित्राने कर्ज काढून
घेतलेल्या बाईकचं,
घरगड्याने आठवडा बाजारातून घेतलेल्या शर्टाचं ,
आणि मध्यमवर्गीय शेजारणीच्या
पाचशेच्या साडीचं...
मनापासुन
कौतुक करता आलं की समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
चाळीतल्या दिवसांच्या,
विटीदांडूच्या-लगोरी-गोट्यांच्या
खेळांच्या आठवणीत मन रमू शकलं
तर समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
मुलीला बार्बी खरेदी करताना,
घराशेजारच्या बांधकामावर आईबाप
काम करत असलेल्या तिच्या
समवयस्क छोटीसाठीही एखादं खेळणं
आठवणीने खरेदी केलत तरी समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
इटालियन-मॅक्सिकन फुड खाताना,
बाबांच्या कमी पगारांच्या दिवसांतली
पोळीभाजी आठवली तरी समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
नवं समृद्ध आयुष्य जगताना, जुने कष्ट आठवले,
ज्यांनी आयुष्य घडवलं ती
मंडळी नुसती आठवली‍,
तरी समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत....
जर मनापासून आवडे तर जरुर इतरांना पाठवा. ...

कवी : सचिन परांजपे

To View G+ Profile of Sachin Click Here

Tuesday, June 3, 2014

सर झुकाने से नमाज़ें अदा नहीं होती...!!!
दिल झुकाना पड़ता है इबादत के लिए...!!!
पहले मैं होशियार था,
इसलिए दुनिया बदलने चला था,
आज मैं समझदार हूँ,
इसलिए खुद को बदल रहा हूँ।।
बैठ जाता हूं मिट्टी पे अक्सर...
क्योंकि मुझे अपनी औकात अच्छी लगती है..
मैंने समंदर से सीखा है जीने का सलीक़ा,
चुपचाप से बहना और अपनी मौज में रहना ।।
ऐसा नहीं है कि मुझमें कोई ऐब नहीं है
पर सच कहता हूँ मुझमे कोई फरेब नहीं है
जल जाते हैं मेरे अंदाज़ से मेरे दुश्मन
क्यूंकि एक मुद्दत से मैंने
न मोहब्बत बदली और न दोस्त बदले .!!..

Friday, May 16, 2014

राजकीय बोलक्या रेषा

Bolkya Resha On Politics राजकीय रेषा


कला : घनश्याम देशमुख
घनश्याम देशमुख यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या राजकीय व सामाजिक स्थिती ,नेते व राजकारणावर व्यंग करणाऱ्या काही निवडक रेषा.




































या सर्व कलाकृती श्री. घनश्याम देशमुख यांच्या असून मला आवडलेल्या रेषा इथे एकत्रित करून ठेवल्या आहेत. घनश्याम देशमुख यांचे व्यंगचित्रकरी मधील योगदान वाढतच असून त्यांचा बोलक्या रेषा हा चित्रप्रकार खूप प्रसिद्ध होत आहे. या कलाकाराला आमचा सलाम.
घनश्याम देशमुख यांच्या सर्व रेषांचा आनंद घेण्यासाठी खालील लिंकवर किंवा त्यांच्या चित्रावर क्लिक करा.
http://www.bolkyaresha.marathi-unlimited.in/

Ghanshyam Deshmukh


( Video of Ghanshyam Deshmukh while creating BOLKYA RESHA )बोलक्यारेषांचे प्रात्यक्षिक देताना यांचा व्हिडीओ पहाण्यासाठी
https://www.youtube.com/watch?v=EVF3a8bneMg

या कलाकाराला दाद देण्यासाठी खाली comment करायला विसरू नका.